दहावीच्या निकालाची उत्सुकता वाढली

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या आठवड्याच्या सुरुवातीलाच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. त्यापाठोपाठ आता दहावीच्या निकालाची उत्सुकता सुद्धा वाढली आहे.बारावीच्या निकालानंतर साधारण ८- १० दिवसांमध्ये दरवर्षी दहावीचा सुद्धा निकाल जाहीर केला जातो. विद्यार्थी व पालकांची उत्सुकता पाहता सोशल मीडियावर तारखांबाबत खोटी माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी बोर्डाने एक अधिसूचना जारी करत १० वी व १२ वी च्या निकालांच्या तारखा mahahsscboard.in वर जाहीर केल्या जातील असे स्पष्ट केले होते. निकालाची तारीख ही मूळ निकालाच्या एक दिवस आधी जाहीर होईल. सकाळी साधारण ११ वाजता निकालाच्या बाबतची एकूण आकडेवारी बोर्डाचे अधिकारी पत्रकार परिषदेत सांगतील तर १ वाजल्यापासून विद्यार्थी आपले गुणपत्रक पाहू शकतीलwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button