दत्तक विधानपत्र नोंदणीची पोलिसांकडून छाननी प्रक्रिया सुरू
बाळ दत्तक देणे-घेण्याची कायदेशीर प्रक्रिया फार काटेकोरपणे पाळावी लागते. सहायक उपनिबंधक कार्यालयाने नुकतेच झालेले दत्तक विधानपत्र, नोंदणी कायदेशीररित्या केले आहे की नाही, याची शहर पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. उपनिबंधक कार्यालयात ही नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाली असल्यास संबंधित अधिकार्याविरूद्धही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.यापूर्वी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रत्नागिरीतील उपनिबंधक कार्यालयात करारनामा, खरेदीखत, गहाणखत, हक्कसोडपत्र, गहाणखत प्रत्यंतरण, मृत्यूपत्र, मुखत्यारपत्र नांदणी केली जातात. वर्षभरात सात ते साडेसात हजार प्रकरणांची नोंद होत असते. यामध्ये दत्तक विधानपत्राची नोंदणी वर्षभरात एखादीच होत असते, असे सहाय्यक उपनिबंधक एस. एस. जयवंत यांनी सांगितले. www.konkantoday.com