
डेरवण येथे विभागीय स्तरावर मल्लखांब कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडा संकुलात विनामूल्य विभागस्तरीय मल्लखांब कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. रत्नागिरी जिल्हा मल्लखांब संघटना चिपळूण आणि डेरवणच्या एसव्हीजेसीटी स्पोर्टस ऍकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.या विभागीय मल्लखांब कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील ३७ मल्लखांब खेळाडूंनी सहभाग नोंदवला.www.konkantoday.com