जामीन रद्द! अल्पवयीन आरोपीला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय
पुण्यात भरधाव वेगात आलिशान पोर्शे कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानं अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बाल हक्क मंडळात हजर करण्यात आलं. भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूत कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.पोलीस तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान आहे ते ठरवलं जाणार आहे. आता त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणाचा संपुर्ण तपास करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अल्पवयीन आरोपी सज्ञान आहे की अज्ञान आहे ते ठरवलं जाणार आहे.या अपघाताचा संपुर्ण तपास होईपर्यंत त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. अपघात प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान ते ठरवले जाईल. तोपर्यंत त्याला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला, त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.www.konkantoday com