
चिपळूण शहरात शाळा-कॉलेज परिसरात अमली पदार्थांची विक्री करणार्यांवर कारवाई करावी
चिपळूण शहर परिसरातील अनेक ठिकाणी शाळा, कॉलेज परिसरात व अन्य ठिकाणी शाळा व विद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी, तरूण व बेरोजगार युवक नियोजित ठिकाणी आपल्या सहकारी मित्रांसह एकत्र येवून गांजा व चरस सारख्या अंमली पदार्थांचे सेवन करीत आहेत. यातून भावी पिढी बरबाद होवू लागली आहे. शहरात राजरोसपणे अमली पदार्थ विक्री होत असल्यानेच हे प्रकार घडत आहेत. तरी या अमली पदार्थांची विक्री करणारे आणि त्याचे सेवन करणार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.www.konkantoday.com