
चिपळूण-कराड मार्गावर निवळी येथे पुण्याहून येणार्या दोन बसेसचा अपघात
चिपळूण-कराड मार्गावर निवळी येथे पुण्याहून चिपळूण आगाराकडे येणार्या दोन एसटी बसेसमध्ये अपघात झाल्याची घटना बुधवारी पहाटे ५ च्या सुमारास घडली. यात चालकासह तिघेजण जखमी झाले असून अपघतात दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले. या दोन्ही बसेसमधून ६७ प्रवासी प्रवास करत होते.श्रावण शंकर बुरटे, सुनिता श्रावण बुरटे, अंजली श्रावण बुरटे (सर्व रा. गोवळकोट), तर वाहक नेताजी शितोळे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पुण्याहून रात्री ९.३० वा. निघालेली पुणे-चिपळूण, ता. चिंचवडहून रात्री १०.३० वाजता निघालेली चिंचवड-चिपळूण (शिवशाही) या दोन्ही बसेस चिपळूण आगाराकडे निघाल्या होत्या. एकापाठोपाठ एक असलेल्या या दोन्ही बसेस कुंभार्ली घाट उतरून पुढे पिंपळीमार्गाने चिपळूणकडे येत असताना तेथे असलेला गतिरोधक पार करण्यासाठी पुणे-चिपळूण बसच्या चालकाने वेग कमी केला असता त्याचवेळी मागून आलेल्या चिंचवड-चिपळूण (शिवशाही) बसच्या चालकाला वेग नियंत्रणात न आणता आल्याने त्याने पुढील बसला जोरदार धडक दिली. पुणे-चिपळूण बसमध्ये ३४ प्रवासी तर चिंचवड चिपळूण (शिवशाही मध्ये ३३ प्रवासी होते. www.konkantoday.com