
खेड तालुक्यातील शिव मोहल्ला येथे चाळीला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग
खेड तालुक्यातील शिव बुद्रूक मोहल्ला या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे एका चाळीला लागलेल्या आगीमध्ये चाळीतील पाच ते सहा घरे जळून खाक झाली. सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र चाळीतील पाच ते सहा घरे जळून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वादळ आणि वारा झाल्यानंतर अचानक एका रूममध्ये शॉर्टसर्किट झाले आणि आग लागली. आगीमध्ये तीव्रता वाढली आणि चाळीतील संपूर्ण घरामध्ये ती आग पेटत गेली. प्र्रसंगावधानामुळे चाळीत राहणारे सर्व लोक बाहेर पडले. स्वयंपाक घरामधील एका सिलेंडरचा स्फोट देखील झाला. त्यामुळे आगीने प्रक्षोभक रूप धारण केले. आगीचे वृत्त समजताच खेड नगरपालिकेचा तसेच लोटे एमआयडीसीच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी मध्यरात्री उशिरापर्यंत आग विषविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी खेड पोलीस तसेच अग्निशामक दलाचे जवान तैनात होते. www.konkantoday.com