
खेड तहसील कार्यालय आवारात वाहनांची गर्दी
खेड शहरात वाहने उभी करण्यासाठी वाहनचलकांना हक्काची जागाच उपलब्ध नसल्याने वाहने नेमकी उभी करायची कुठे, असा प्रश्न सतावत आहे. त्यातच कै. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरूस्ती कामामुळे आवारात वाहने उभी करण्यास अटकाव करण्यात आला आहे. याचमुळे बहुतांश वाहनचालक तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सर्रासपणे वाहने उभी करत आहेत. या वाहनांनी तहसील कार्यालयाचे आवार पूर्ण पॅक होत असून दैनंदिन कामकाजासाठी येणार्या नागरिकांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. www.konkantoday.com