सुट्ट्यांमुळे गुहागर पर्यटकांनी बहरले, व्यावसायिकांना फायदा
कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून नावारूपास येत असलेले गुहागर उन्हाळी सुट्ट्यांमुळे बहरले आहे. गुहागर चौपाटीसह तालुक्यातील सर्वच प्रेक्षणीय स्थळे आणि हॉटेल, लॉज, घरगुती राहण्याची, जेवणाची ठिकाणे पर्यटकांनी बहरली आहेत.गुहागरमध्ये शाळा व महाविद्यालयाच्या परीक्षा संपल्यानंतर पर्यटक दरवर्षी गुहागरात मोठी गर्दी करतात. तालुक्यात या पर्यटन हंगामात दिवसाला हजारो पर्यटक येत असतात. गुहागर हे सुरक्षित ठिकाण असल्याने सर्वाधिक कौटुंबिक पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. निसर्ग सौंदर्याबरोबरच लांबलचक समुद्र चौपाटी लाभलेल्या गुहागरची ओळख राष्ट्रीय पातळीवर केव्हाच पोहोचली आहे.www.konkantoday.com