वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाईग्रस्त गावे पोहोचली शतकाच्या उंबरठ्यावर
वाढत्या तापमानामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या आता शतकाच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आले. दर आठवड्याला टंचाईग्रस्त गावांत मोठी भर पडत असून आता ही संख्या ९१ गावांपर्यंत पोहोचली असून या गावातील २२८ वाड्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या टंचाईची झळ जिल्ह्यातील सुमारे ५६ हजार ६७० लोकांना बसलेली आहे.जिल्ह्यातील टंचाईग्र्रस्त वाड्यांनी आठवडाभरापूर्वी शंभरी ओलांडलेली होती. दोन आठवड्यात ही संख्या २२८ वाड्यांपर्यंत मजल मारली आहे. त्या टंचाईची झळ जिल्ह्यातील सुमारे ५६ हजार ६७० लोकांना बसली आहे. दिवसागणिक त्या वाड्यांची टंचाईग्रस्त संख्येत भर पडली आहे. www.konkantoday.com