वरंध घाटातील कामामुळे घाट ३१ मे पर्यंत वाहतुकीला बंद
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रदेशांना जोडणारा वरंध घाट मार्ग संरक्षण भिंत, डांबरीकरण रस्त्याचे रूंदीकरण या महत्वाच्या कामासाठी ३१ मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.म्हाप्रळ, महाड, भोर, पंढरपूर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्यानंतर राजेवाडी फाटा ते वरंधा घाटातील रायगड जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत असलेल्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असून वरंधा घाटातील रस्त्याच्या रूंदीकरणाचे संरक्षक भिंतीचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी वरील सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. www.konkantoday.com