राजापूर तालुक्यातील धोपेश्वर सोलगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार
राजापूर तालुक्यातील धोपेश्वर सोलगाव परिसरामध्ये सध्या बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. दिवसा जंगलामध्ये तर रात्री लोकवस्तीमध्ये बिनधास्त फिरणार्या बिबट्याने शेतकर्यांची जनावरेही मारली असल्याची घटना घडली आहे.राजापूर धोपेश्वर सोलगाव ते देवाचे गोठणे व रत्नागिरी रस्त्यावर अनेकवेळा रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणार्या वाहन चालकांना मुक्तपणे फिरणार्या बिबट्याचे दर्शन होत आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून जंगल परिसरामध्ये दिसणारा बिबट्या थेट लोकवस्तीमध्ये रात्रीच्या वेळा दिसू लागला आहे. काही दिवसांपूर्वी धोपेश्वर बारसू येथील कदम यांचा बैल बिबट्याने मारल्याची घटना घडली आहे. तर दोन दिवसांपूर्वी सोलगाव येथील गुरव यांच्या घरातील पाळीव मांजराची शिकार केल्याची घटना घडली आहे. तसेच या परिसरातील वस्तीमध्ये घुसून अनेक कुत्रांची शिकार केली आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये दहशत पसरली आहे. पावसाळी शेती हंगामाच्या तोंडावर जनावरे मारणार्या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.www.konkantoday.com