
रत्नागिरी शहरानजिकच्या शिरगांव आडी येथे आंबा बागेत आढळला गुरख्याचा मृतदेह
रत्नागिरी शहरानजिकच्या शिरगांव आडी येथील आंबा बागेत राखणदारीचे काम करणार्या गुरख्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. नवराज बळीराम पुरी (५०, रा. कैलाली नेपाळ, सध्या शिरगाव आडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवराज पुरी हा शिरगाव आडी येथे आंबा बागेत राखणीचे काम करत होता. २० मे २०२४ रोजी सकाळी त्यांचा मृतदेह झोपडीत आढळून आला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे पाठवला. तसेच या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com