रत्नागिरी जिल्ह्यातील पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या पहिल्या दिवशी ४३९ शिक्षकांना मिळाली नियुक्तीपत्रे
रत्नागिरी जिल्ह्यातील नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना शाळा नियुक्त्या देण्यासाठी रत्नागिरी शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेत आयोजित समुपदेशन प्रक्रियेला सोमवारपासून प्रारंभ झाला. राज्यभरातून निवड झालेल्या शिक्षक उमेदवारांनी पहिल्या दिवशी समुपदेशनासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. सोमवारी ४३९ शिक्षकांना शाळा नियुक्तीपत्रे देण्यात आली. दरम्यान २१ मे रोजी समुपदेशनची प्रक्रिया चालणार आहे.सन २०१७ व २०२४ या कालावधीत शिक्षण सेवक भरती प्रक्रियेमध्ये राज्यातील उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यांच्यासाठी २० मे आणि मंगळवारी २१ मे रत्नागिरीतील शिर्के प्रशालेत सकाळी ठिक ८ वाजता समुपदेशन प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व खेळाडू या समांतर आरक्षणातून निवड झालेल्यांना संबंधित कार्यालयाचा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नियुक्ती दिली जाणार आहे.www.konkantoday.com