महामार्गावरच्या पाण्याचे व्यवस्थापन न झाल्यास १० जूननंतर जनआक्रोश आंदोलन -मुरादभाई अडरेकर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि गुहागर-विजापूर राष्ट्रीय महार्मावर सातत्याने पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे वाहतूक धोकादायक बनली असून अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे. तरी महामार्गावर साचणार्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी तातडीने व्यवस्थापन करावे, अन्यथा १० जूननंतर जनआक्रोश आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुरादभाई अडरेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.www.konkantoday.com