मराठा सर्वेक्षण प्रगणकांचे मानधन संघटनेच्या पाठपुराव्यानंतर जमा
मराठा समाज आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांच्या मदतीने राज्यभर सर्वेक्षण केले. मात्र याचे मानधन प्रगणक व पर्यवेक्षकांना प्राप्त झाले नव्हते. अखेर प्राथमिक शिक्षक संघाच्या पाठपुराव्यानंतर हे मानधन त्यांच्या खात्यात जमा झाले आहे.या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाला सादर झाला असून राज्य शासनाने हा अहवाल स्वीकारला आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया पूर्ण होवूनही प्रगणक व पर्यवेक्षकांचे मानधन दिले गेले नसल्याने ते अदा करावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीनुसार सर्वेक्षण काम करणारे प्रगणक व पर्यवेक्षकांच्या बँक खात्यात मानधन अदा केल्याचे रत्नागिरी प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा सरचिटणीस संदीप जालगावकर यांनी कळवले आहे. www.konkantoday.com