बेदरकारपणे अ‍ॅपे टेम्पो चालवून अपघात करत हौद्यातील तीन जणांच्या दुखापतीस कारणीभूत, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

बेदरकारपणे अ‍ॅपे टेम्पो चालवून अपघात करत हौद्यातील तीन जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना रविवार 12 मे रोजी सायंकाळी 6.30 वा.डी-मार्ट स्टोअर समोरील रस्त्यावर घडली होती.मलिक मेहबूब गोरे (39,रा.आदर्शनगर कारवांची वाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. तसेच या अपघातात पंकज राजेंद्र मोरे (रॉयलसिटी,कारवांचीवाडी,रत्नागिरी), संदेश सुभाष भारती (38,रा.गयाळवाडी खेडशी,रत्नागिरी), प्रकाश श्रीशैलेकावाशी (23, मुळ रा.कर्नाटक सध्या रा.आदर्शनगर,रत्नागिरी) हे तिघे जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी मलिक गोरे आपल्यात ताब्यातील अ‍ॅपे टेम्पो (एमएच-08-एक्यु-1910) च्या हौद्यातून या तिघांना घेउन रत्नागिरी ते हातखंबा असा जात होता. तो डी-मार्ट समोर आला असता त्याचा टेम्पोवरील ताबा सूटला. त्यामुळे टेम्पो रस्त्यावर पलटी होउन त्यात हे तिघे जखमी झाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button