
दापोलीतील उद्यानविद्या उत्कृष्ट महाविद्यायाचा मान दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा
५२ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थात्मक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट महाविद्यालयाचा मान दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाने पटकावला. तसेच विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांच्याकरिता आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेया स्पर्धकांचा गौरव नुकताच करण्यात आला.विद्यापीठाकडून दरवर्षी देण्यात येणार्या संस्थात्मक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून उद्यानविद्या महाविद्यालय दापोली, उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालय, रत्नागिरी यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि ५ लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्याहस्ते देवून गौरविण्यात आले.www.konkantoday.com