कोकण रेल्वे मार्गावरील मंगलासह गांधीधाम २३ रोजी धावणार विलंबाने

कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे ते भोके दरम्याने मालमत्ता देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या अडीच तासांच्या मेगाब्लॉकमुळे २३ मे रोजी धावणार्‍या मंगला एक्सप्रेस व गांधीधाम एक्सप्रेस या दोन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस विलंबाने धावणार आहेत.या दोन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस जलद गतीने धावत असल्याने प्रवाशांची विशेषतः पर्यटकांची एक्सप्रेसला सर्वाधिक पसंती आहे. गोव्याच्या दिशेने धावणार्‍या दोन्ही एक्सप्रेस हाऊसफुल्ल धावत आहेत. २४ मे रोजी सकाळी ७ ते सकाळी ९.३० या वेळेत घेण्यात येणार्‍या मेगाब्लॉकचा परिणाम दोन्ही एक्सप्रेसच्या गाड्यांवर होणार आहे. शुक्रवारी या दोनी एक्सप्रेस उशिराने मार्गस्थ होणार असल्याने प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागणार आहे.एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस मंगला एक्सप्रेस २३ मे रोजी मडगाव ते रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ५० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. तिरूनेलवेली-गांधीधाम एक्सप्रेस २३ मे रोजी कोकण मार्गावर आल्यानंतर २४ मे रोजी मडगाव ते रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button