
कोकण रेल्वेची विना तिकीट प्रवाशांविरुद्ध तिकीट तपासणी मोहीम, दोन कोटी साठ लाखाचा दंड वसूल
गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. एप्रिल 2024 मध्ये एकूण 15,129 अनधिकृत/अनियमित प्रवासी तिकीट नसलेले आढळून आले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण ₹2,69,85,256/- दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वेवरील अनियमित/अनधिकृत प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे. एप्रिल 2024 मध्ये प्रकरणांची संख्या – 15,129. दंड वसूल – ₹2,69,85,256/- कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करत आहे.येणाऱ्या काळात हि KRCL च्या संपूर्ण मार्गावर तीव्र तिकीट तपासणी मोहिम सुरू राहणार आहे.”अभिमानाने प्रवास करणार, सन्मानाने प्रवास करणार, तिकीट काढून अभिमानाने प्रवास करा असा आवाहन कोकण रेल्वे प्रशासन करत आहे.www.konkantoday.com