
कोकणकन्या एक्सप्रेसमधून प्रवाशाची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न
कोकण मार्गावरून धावणार्या कोकणकन्या एक्सप्रेसला अज्ञात चोरट्यांनी टार्गेट करत प्रवाशांचे दागिने हिसकावण्याचे सत्र सुरू आहे. याच एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या एका प्रावाशाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रकार दिवाणखवटी स्थानकात घडल्याचे समोर आले आहे. कोकणकन्या एक्सप्रेस अन दिवाणखवटी रेल्वेस्थानक हे अज्ञात चोरट्यांचे मुख्य केंद्र बनले असून टोळी कार्यरत असण्याची शक्यता यापूर्वीच वर्तविण्यात आली होती. मात्र अजूनही रेल्वे पोलिसांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. www.konkantoday.com