कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा 25 मे रोजी मासिक स्नेह मेळावा, नर्मदा परिक्रमाचा अनुभव दोन भगिनी कथन करणार

रत्नागिरी (वा.) : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा येत्या शनिवार दिनांक 25 मे 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता ज्येष्ठ नागरिक भवनात संपन्न होणार आहे. यावेळी 120 दिवसांची नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या मिरजोळे येथील सौ. मधुरा विद्याधर चिंचाळकर आणि सौ. नेहा विद्याधर देशकुलकर्णी या ज्येष्ठ नागरिक भगिनी नर्मदा परिक्रमातील अनुभव कथन करणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी मे महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात येणार आहेत.. ज्या ज्येष्ठ नागरिक सभासदांनी आपला सन 2024 – 25 चा प्रत्येकी दोनशे रुपये आधार निधी जमा केला नसेल त्यांनी यावेळी तो संघाकडे जमा करावा. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ म्हणजेच फेस कॉम मुंबई या राज्यस्तरीय संस्थेचे मुखपत्र असलेल्या मनोहरी मनो युवा या मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी वार्षिक वर्गणी रुपये 350 आणि दीवार्षिक वर्गणी रुपये 600 संघाच्या कार्यालयात मेळाव्याच्या दिवशी जमा करून सहकार्य करावे. मनोहरी मनो युवा या मासिकात ज्येष्ठांसाठी आरोग्य, उतारवयाची समस्या, कौटुंबिक समस्या ज्येष्ठांसाठी शासकीय योजना व सवलती, हेल्पलाइन यासारखी महत्त्वपूर्ण माहिती प्रसिद्ध होत असते. त्यामुळे मनोहारी मनो युवा हे मासिक ज्येष्ठांचा घरचा मार्गदर्शक ठरले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी 25 मे रोजीच्या मासिक स्नेह मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button