
अपघातग्रस्त मालवाहू कंटेनर अजूनही दुभाजकावरच लटकलेला
मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या जगबुडी पुलावरील दुभाजकाच्या मध्यभागीच अडकलेला मालवाहू कंटेनर अजूनही लटकलेल्या स्थितीतच आहे. हा कंटेनर हटवणे यंत्रणांसमोर आव्हान असून हटवण्याच्या प्रक्रियेदरम्यान तो केव्हाही जगबुडी नदीपात्रात कोसळून मोठी हानी होवू शकते. याचमुळे कंटेनर हटवण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. चालक कैफ अब्दुल खान हा आपल्यया ताब्यातील मालवाहू कंटेनर घेवून मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना भरणे येथील नव्या जबगुडी पुलावरील वक्राकार वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर थेट दुभाजकातच अडकला. या अपघातातून कंटेनर चालक बालंबाल बचावला आहे. दुभाजकाच्या मध्यभागीच लटकलेल्या स्थितीत आहे. या अपघातामुळे दुबाजकाची मोठी नासधूस झाली आहे. कंटेनर सुरतिरित्या हटविण्यासाठी यंत्रणा कोणत्या यंत्रणांचाा वापर करते याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे. www.konkantoday.com