18 ते 65 वयोगटासाठी अवघ्या 755 रुपयांमध्ये पंधरा लाखाचा पोस्टाचा अपघाती विमा

रत्नागिरी, दि. 21 पत्रव्यवहार, पैशांचे व्यवहार याव्यतिरिक्त विविध योजना व 755 रुपयांमध्ये पंधरा लाखांचा अपघाती विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान आहे ते पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती विभाग डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी दिली. निवाबूपा या नामांकित आरोग्य विमा इन्शुरन्स कंपनीसोबत पोस्ट कार्यालयाने सुरू केली आहे. अपघाती विमा पॉलिसी अपघाती विम्यात पॉलिसी धारकाचा मृत्यू कायमस्वरूपी तात्पुरता किंवा अंशतः अपंगत्वाच्या जोखीमेपासून संरक्षण मिळते. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर वारसाला विम्याची रक्कम मिळते. अपघातातील अपंगत्व किती टक्के आहे, यावर विम्याची रक्कम अवलंबून आहे. या पोस्ट ऑफिस योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते असणे आवश्यक आहे. ग्राहक नुकसानभरपाई व्यतिरिक्त त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये आणि विवाहित मुला-मुलींना एक लाख रुपये दिले जातील. अपघातात पॉलिसीधारकाचे हाड तुटल्यास उपचारासाठी २५ हजार रुपये देण्याची सुविधा आहे. पॉलिसीमध्ये मातृत्वाची सुविधाही देण्यात आली आहे. विमा पॉलिसीमुळे संकट काळात तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला किंवा पोस्टमनला भेटून ही पॉलिसी घेऊ शकता. योजनेचा जास्तीस जास्त लाभ घेऊन आपले व कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहनही श्री. कुरळपकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button