विशाल मयेकर खून प्रकरणातील संशयित शशिभूषण सनकुळकर खेर पोलिसांच्या जाळ्यात
दापोली तालुक्यातील कोळथरे येथील विशाल मयेकर खून प्रकरणातील संशयित शशिभूषण शांताराम सनकुळकर (४७, रा. कोळथरे) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गेले तीन दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर गावातील एका शेतात लपून बसलेल्या शशिभूषणला सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु तपासकाम सुरू असल्याचे कारण देत दाभोळ पोलिसांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.दारू पिताना मित्रा-मित्रांमध्ये वाद होवून विशाल शशिकांत मयेकर (३९, रा. पंचनदी-निमुर्डेवाडी) याचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. गावात चौकशी केली असता मयत विशाल मयेकर, संशयित शशिभूषण सनकुलकर व मनोज आरेकर यांची चांगली मैत्री असल्याचे समजले हे तिघेही जणगावमध्ये आंबे काढणे, नारळ काढणे अशी कामे करत असत.www.konkantoday.com