रत्नागिरी जिल्ह्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकडे पुरूष फिरवताहेत पाठ
नसबंदी केल्यानंतर पौरूषत्व कमी होते, नसबंदी प्रक्रिया अधिक धोकादायक, वेदनादायक आहे. नसबंदी केल्याने कर्करोगाचा आजार वाढतो या गैरसमजातून पुरूषांनी नसबंदीकडे पाठ फिरवली आहे. वर्षभरात फक्त पाच पुरूषांनी नसबंदी केली आहे. नसबंदी केल्यास फक्त ११०० रुपयांचे अनुदान दिले जात असल्यामुळे पुरूषांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.वर्षभरात २९५१ महिलांनी शस्त्रक्रिया केली आहे. पुरूष नसबंदी झटपट करता येते. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा अधिक सोपी, सुरक्षित आहे. स्थानिक वैद्यकीय अधिकारी भूल देवून स्थानिक आरोग्य केंद्रात देखील नसबंदी करू शकतात. नसबंदीनंतर केवळ एका तासात महिलांना घरी पाठवले जाते. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी महिलांनी स्विकारली आहे. पुरूष शस्त्रक्रिया वाढविण्यासाठी राज्य शासनाला विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करताना आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. www.konkantoday.com