
मित्रासोबत फिरण्यासाठी आलेल्या सांगली येथील पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू
मित्रासोबत आलेल्या पर्यटकाचा चिपळुणात मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. पांडुरंग गोविंद लोकुळकर (४९, रा. खानापूर, सांगली) असे मृत झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग लोकुळकर हे त्यांच्या मित्रासोबत दापोली समुद्रकिनारी फिरण्यास आले होते. ते दापोली ते विटा-सांगली असे गाडीने जाात असताना शहरातील मार्कंडी येथील अभिषेक हॉटेल येथे जेवणाकरिता थांबले होते. यावळी लोकुळकर हे काणतीही हालचाल करत नसल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले होते. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी कामथे रूग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.www.konkantoday.com