पाचव्या टप्प्यासाठी सबंध देशभरातून 57.51% मतदान
देशभरात सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठीचे मतदान सोमवारी पार पडले. ज्यामध्ये आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 संसदीय मतदारसंघांचा समावेश होता. पाचव्या टप्प्यासाठी सबंध देशभरातून 57.51% मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगाल 73% मतदानाच्या आकडेवारीत आघाडीवर आहे, त्यानंतर लडाख 67.15%, झारखंड 63% आणि ओडिशा 60.72% आहे. इतर राज्यांमध्ये सहभागाचे दर भिन्न आहेत: उत्तर प्रदेश 57.79%, जम्मू आणि काश्मीर 54.67%, बिहार 52.60% आणि महाराष्ट्र 49.01% अशी ही आकडेवारी आहे. मुंबईतील मतदानाची टक्केवारी निराशाजनकपणे कमी राहिली, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 50% चा आकडा पार करता आला नाही. मुंबईतील मतदानाच्या तपशीलवार आकडेवारीनुसार झालेले मतदान खालीलप्रमाणे. मुंबई उत्तर: 46.91%- मुंबई उत्तर मध्य: 47.46%- मुंबई ईशान्य: 48.67%- मुंबई उत्तर पश्चिम: 49.79%- मुंबई दक्षिण: 44.63%- मुंबई दक्षिण मध्य: 48.26%