
रिफायनरी प्रकल्पाबाबत काँग्रेसची नौटंकी
राजकीय विरोधासाठी नाणार रिफायनरी प्रकल्पाला विनाशकारी म्हणणाऱया काँग्रेस पदाधिकाऱयांच्या नौटंकीची कीव करावीशी वाटते. अशी टीका कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी केली आहे.
अणुऊर्जा प्रकल्प काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीत आला म्हणून तो पवित्र आणि रिफायनरी प्रकल्प मात्र अपवित्र अशी दुप्पटी भूमिका काँग्रेसचीआहे. काँग्रेस शासनाच्या काळात देशात जवळजवळ तेवीस रिफायनरी प्रकल्प झाले. आता हीच काँग्रेस जिल्ह्याच्या विकासासाठी विशालदृष्टीकाेन न ठेवता राजकीय विरोधासाठी वेगळी भूमिका घेत आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आधी या प्रकल्पाबाबत सखोल माहिती घ्यावी आणि मगच या विषयी बोलावे असे आंबेरकर यांनी म्हटले आहे.काही राजकीय पक्ष रिफायनरी विरोधाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
www.konkantoday.com