
दुचाकी चोरून कोल्हापूरच्या दिशेने पळून जाणार्या दोघा आरोपींच्या अणुस्कुरा घाटात मुसक्या आवळल्या
दुचाकी चोरून कोल्हापूरच्या दिशेने पळून जात असताना पोलिसांना पाहून अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या अन्य दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सलग दोन दिवस जंगलात शोधमोहीम राबविल्यानंतर सोमवारी सकाळी दीपक श्रीमंदीलकर आणि अजय घेगडे (दोघेही रा. पारनेर-अहमदनगर) या दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शनिवारी दोन दुचाकीवरून तीन अनोळखी तरूण ओणीमध्ये आले होते. त्यांनी पिस्तुलसारख्या दिसणार्या लायटरने ओणीमधील एका दोघांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराची माहिती राजापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरली होती. दरम्यान ओणीवरून अणुस्कुरा घाटाच्या दिशेने दोन दुचाकीवरून तिघेजण मार्गस्थ होत असताना उणुस्कुरा येथील चेकपोस्टवर पोलीस पाहून ते हबकले आणि त्यांनी येरवड्याच्या दिशेने पलायन केले. वाटेतच दोन्ही दुचााकी सोडून ते आजुबाजूला असलेल्या जंगलात जावून लपले. www.konkantoday.com