खेड बसस्थानकातील तो होर्डिंग अखेर हटवला
चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्यामुळे येथील एसटी बसस्थानकातील धोकादायक स्थितीतील वाकलेला होर्डिंग हटवण्यास अखेर एसटी प्रशासनाला शनिवारी सायंकाळी सवड मिळाली. यामुळे रिक्षा व्यावसायिकांसह प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.घाटकोपर येथील दुर्घटनेनंतरही बसस्थानकातील अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी एसटी प्रशासनाला अजूनही जाग आलेली नव्हती. बसस्थानकातील १० होर्डिंगना परवानगीच नसल्याची बाब समोर आलेली असताना देखील शासनाचे आदेश पायदळी तुडवले जात आहेत. चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्यामुळे एक होर्डींग अर्धवट स्थितीत होता. यामुळे नजिकच्या रिक्षा व्यावसायिकासह प्रवाशांचा जीव टांगणीवर होता. www.konkantoday.com