2019 साली एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एका मुलाखतीत 2004 आणि 2019 मधील मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे.2004 साली अजित पवार नवखे होते. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत नव्हते. छगन भुजबळ किंवा अन्य नेत्यांकडे हे पद दिले असते तर पक्ष फुटण्याचा धोका होता, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या प्रयोगात 2019 साली एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. मात्र त्यांचे नाव आमच्यापर्यंत आलेच नाही. शिवसेनेतच त्यांच्या नावाबाबत अंतर्गत चर्चा झाली होती. त्याची माहितीही आम्हाला नंतर मिळाली. त्यांच्या नावाला आमची काहीच हरकत नव्हती. मात्र, शिवसेनेनेच त्याबाबत पुढाकार घेतला नाही, असे अनेक खुलासे शरद पवार यांनी या मुलाखतीत केले आहेत. 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले असतानाही शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रिपद दिले होते. यासंदर्भात होणार्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी त्याबाबतचा गौप्यस्फोट केला.www.konkantoday.com