लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात घेण्याची भाजपची रणनीती फसली -ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव
महाराष्ट्रात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. हा राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. शेवटच्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात मतदान सुरु असतानाच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात घेण्याची भाजपची रणनीती फसली असल्याचं म्हटलं आहे.शिवाय या निवडणुकीत भाजपला केवळ 150 जागांवर मिळतील तर इंडिया आघाडीला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात महाराष्ट्रात कधीही लोकसभा निवडणुकीसाठी 5 टप्प्यात मतदान झालेलं पाहिलं नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात प्रचार सभांसाठी वेळ मिळावा, यासाठी 5 टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या. परंतु, पाच टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्यामुळे मतदान लांबलं आणि लांबलेलं मतदान भाजपच्या विरोधात गेलं आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या दोन टप्प्यानंतर भाजपने राज्यात 45 पारची भाषा बंद केली असल्याचं जाधव म्हणाले.www.konkantoday.com