लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी आज मतदान
महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होतय . मुंबईत मतदानानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. 5 अप्पर पोलीस आयुक्तांसह 25 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील ज्या मतदारसंघात निवडणूक होणाराय, त्यामध्ये मुंबईतील 6 तसंच ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे. पियूष गोयल, भारती पवार, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे आदी दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा आहे. या टप्प्यानंतर सर्वांनाच उत्सुकता असेल ती 4 जूनच्या निकालाची.