
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या रत्नागिरीचे चौघांची निवड
पुणे येथे झालेल्या बैठकित महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी जाहिर केली. सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींना समाविष्ट करतानाच ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या फळीला काम करण्याची संधी देण्यात आली आहे.पूणे येथील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकिला अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व संयुक्त चिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रा. चद्रजीत जाधव यांनी सर्व उपसमीत्या जाहिर केल्या. या सर्व उपसमित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहणार आहेत. स्पर्धा समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी रत्नागिरीचे संदीप तावडे, प्रसिद्धी समितीच्या सचिवपदी राजेश कळंबटे, खेळाडू नोंदणी व तांत्रिक समिती सदस्यपदी कृष्णा करंजळकर तर निधी संकलन समितीवर यतीन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या स्विकृत उपाध्यक्षपदी लातूरचे आमदार अभिमन्यू पवार, पालघरच्या सौ. ग्रीष्मा पाटील, पुण्यातील सौ. अश्विनी पाटील यांची निवड करण्यात आली आहे.www.konkantoday.com