पुणे, नांदेड, बीड, औरंगाबादसह त्रिपुरा येथील 20 बुद्ध विहारांना बुद्धरूपांचे वितरण
बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दि महाचुला अलुमिनी असोसिएशन, बँकॉक, थायलंड, रेंजहिल्स रहिवासी सभा व रेंजहिल्स रहिवासी महिला सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शताब्दी बुद्ध विहार येथे ‘बुध्दरूप (बुद्धमूर्ती) प्रदान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. थायलंड येथून आलेल्या साडे पाच फुट ऊंच, अतिशय देखण्या, आकर्षक अशा या पितळी धातूंच्या बुद्धरूपांचे पुणे शहर, पुणे जिल्ह्यासह नांदेड, महाड, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि त्रिपुरा येथील 20 बुद्ध विहारांना वितरण करण्यात आले. यावेळी भंते नागघोष (पुणे) भंते हान (व्हिएतनाम), भंते संघदूता (अरुणाचल प्रदेश), भंते धम्मानंद (पुणे) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण (विभाग प्रमुख विस्तार व सेवा योजना, बार्टी), प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या प्रसंगी धम्म प्रसारक भारतीय सत्यशोधक महासंघ, लातूरचे डी. एस. नरसिंगे आणि सूर्यप्रकाश फाऊंडेशन, बीडचे प्रकाशसिंग तुसाम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.