
तीव्र उन्हाळ्यामुळे यंदा अंड्यातून कासवं बाहेर येण्याचे प्रमाण जवळपास तीस टक्क्याने घटले
* कोकण किनारपट्टीवर गेल्या पंधरा ते वीस दिवसांत उष्णतेची लाट पहायला मिळाली. ज्याचा विपरीत परिणाम कोकणातील ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहीमेवरही झाला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे यंदा अंड्यातून कासवं बाहेर येण्याचे प्रमाण जवळपास तीस टक्क्याने घटले आहे.ज्यामुळे कासवांच्या पिल्लांची संख्या घटली आहे.यंदा वाढलेल्या उष्णतेमुळे अंडी खराब होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कासवांच्या पिल्लांच्या जन्मदरात मोठी घट झाली असल्याचे निरीक्षण कासव संवर्धन प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांनी नोंदविले आहे.www.konkantoday.com