
गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा
राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय. सध्या इथं कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्याचा मतदानावर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळंच कांद्यासंबंधीच्या एका घटनेनं इथं मतदान केंद्रावर लक्ष वेधून घेतलं. काही शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गळ्यात कांदे आणि टोमॅटोच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावला.नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू इथले युवा शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानाला गेले. पण त्यांना पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवलं आणि कांद्याच्या माळा काढून मतदान करण्यास सांगितलं. “ज्यांनी केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेची संधी,” अशा घोषणाही या तरुणांनी यावेळी दिल्या. या प्रकारामुळं वडगाव इथं मोठा जनसमुदाय गोळा झाला होता पण पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणलं.www.konkantoday.com