कुंभार्ली घाटात ट्रेलरची कारला धडक, दोन महिला जखमी
कुंभार्ली घाटात ट्रेलरने कारला धडक दिल्याने दोन महिला जखमी झाल्या तर कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना नुकतीच घडली. या अपघातात कारमधील मायलेकी जखमी झाल्या. त्यांच्यावर चिपळूण येथे खाजगी रूग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. यातील फिर्यादी परशुराम पाटील यांनी आपल्या ताब्यातील कार (क्र. एम.एच. ०८ एजी-१९९६) घेवून ते स्वतः चालवित बेळगावकडे जात असताना कुंभार्ली घाटातील सोनापात्राचे वरील बाजूस असलेल्या पाचव्या वळणामध्ये कराड बाजूकडून येणारा ट्रेलर (क्र. डी. डी. ०३ आर-९११७) वरील आरोपी चालक सुनिल तानाजी जाधव (५४, रा. भोळेवडी, ता. कराड, सातारा) याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर उताराने वळणात भरधाव वेगाने हयगयीने, अविचाराने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष न देता चालवून निर्यादीने गाडीला ड्रायव्हर बाजूला जोराची धडक दिल्याने फिर्यादी यांची बाजूस बसलेली पत्नी सौ. लक्ष्मी परशुराम पाटील (४८) व मागील सिटवर बसलेली मुलगी प्रतिक्षा परशुराम पाटील (२३, दोन्ही रा. कापसाळ टेपरवाडी, ता. चिपळूण) यांना लहान मोठ्या दुखापतीस व फिर्यादीच्या गाडीने नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com