
ईव्हीएम मशिनला हार घातला, शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान केलं. त्यांनी सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशिनला हार घातला. यामुळे शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात चार हजार मतदान केंद्रात मतदान होणार असून एकूण २० लाख ३० हजार १२४ मतदार आहेत.स्वामी शांतिगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनला आपल्या गळ्यातला हार घातला. नाशिक लोकसभेच्या रिंगणात स्वामी शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत.www.konkantoday.com