आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

लखनऊ : यूपीच्या फर्रुखाबाद येथे एका तरुणाने आठवेळा मदतान केल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील अलीगंज विधानसभा मतदान केंद्र-३४२ येथे हा प्रकार घडला आहे.एका व्यक्तीने आठवेळा मतदान केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत याबाबत तक्रार केली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला होता. वातावरण तापत असल्याचं पाहून निवडणूक आयोग सक्रिय झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेतले जाणार आहे.आरोपी तरुण हा १७ वर्षाचा असल्याची माहिती आहे. त्याला जिल्हा प्रोबेशन अधिकारी यांनी ताब्यात घेतले आहे. एकानंतर एक असे आठवेळा मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने शेअर केला होता. शिवाय आपण कोणाच्या नावे मतदान करतोय हे देखील त्याने सांगितले होते. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर होता. त्यामुळे निवडणूक आयोगाला तात्काळ दखल घ्यावी लागली.आरोपी तरुण भाजप उमेदवाराला आठवेळा मतदान करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखिलेश यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी ही पोस्ट रिपोस्ट केली. सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button