
रत्नागिरी शहरातील शिवखोल राजीवडा कोरोना बाधित सील क्षेत्राचा नकाशा जारी
रत्नागिरी शहरातील शिवकाल राजीवड भागात एक कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शिवखोल राजीवडा व आजूबाजूचा परिसर करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केला असून या बाधित क्षेत्राचा नकाशाही प्रसिद्ध केला आहे.या बाधित क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना सदर बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढलेल्या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.
www.konkantoday.com
