
सोने तारण घेणार्या पतसंस्थांसाठी लवकरच सुरक्षा उपायांची शिफारस, वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा उपनिबंधकांची बैठक
लोकांनी सोने गहाण ठेवून कर्ज उचल केली. आणि गहाणवटीचे सोने चोरट्याने योजनापूर्वक लुटून नेले हा प्रकार राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथे दोन दिवसांपूर्वी घडला. पोलीस यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची एक बैठक घेवून सुरक्षेसाठी व्यापक योजना तयार करण्याचे निश्चित झाले. सीसीटीव्हीसह सुरक्षा रक्षक व अन्य उपाययोजनांवर अभ्यास करून तो कार्यक्रम सोने तारण घेणार्या सर्व पतसंस्थांसाठी शिफारस करण्यात येणार आहे.रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोपान शिंदे यांची एक बैठक नुकतीच पार पडली. मिठगवाणे येथील पतसंस्थेच्या ताब्यातील साडेचार कोटींपेक्षा अधिक रकमेचे सोने योजनाबद्ध रितीने चोरीस गेल्याचाा मुद्दा बैठकीच्या पार्श्वभूमीवर होता. रत्नागिरी जिल्ह्यातील सोने तारण घेणार्या पतसंस्थांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. www.konkantoday.com