समान उद्दिष्ट असलेल्या अन्य साहित्यिक संस्थांमध्ये जबाबदारीचे पद घेता येणार नाही, कोमसापच्या बैठकीत निर्णय
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबईत झालेल्या बैठकीत वेगळ्याच मुद्यांवर चर्चा झाली. समान उद्दिष्ट असलेल्या अन्य साहित्यिक संस्थांमध्ये जबाबदारीचे पद घेता येणार नाही हा संकेत पाळावा असे वरिष्ठ पदाधिकार्यांनी सांगितल्याने काही विद्यमान पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.अलिकडेच कोमसापची मुंबई विभागाची बैठक पार पडली. बैठकीत केंद्रीय समितीच्या ४ सदस्यांनी आपले मत मांडले की, समान उद्दिष्ट असलेल्या अन्य साहित्यिक संस्थांमध्ये कोमसाप पदाधिकार्यांनी जबाबदारीचे पद घेवू नये, संस्थेच्या मुंबई जिल्हाध्यक्ष लता गुठे यांनी विश्वभरारी फाऊंडेशन या संस्थेचा राजीनामा दिला आहे. काही सदस्यांनी या संदर्भात वेगळी भूमिका घेत अनेक ठिकाणी पदाधिकारी असल्याचे स्वातंत्र्य मागितले आहे. कोमसापचे पदाधिकारी म्हणून काम करत असताना अन्य संस्थांच्यामध्ये काम करण्यास मज्जाव नाही, मात्र निष्ठेने काम करण्यासाठी कोमसाप पदाधिकार्यांना दुसर्या संस्थेस पदाधिकारी होता येणार नाही. हे नैतिक बंधन प्रत्येकाने घालून घेतले पाहिजे असे संस्थेचे विश्वस्त रमेश कीर यांनी स्पष्ट केले. घटनात्मक तरतूद किंवा नियम यापेक्षा नैतिकतेचे आचरण महत्वाचे आहे. कोमसापमध्ये एक पदाधिकरी अनेक संस्थांमध्ये पदाधिकारी होवू नयेत, ते योग्य ठरणार नाही अशी भूमिका कोमसापच्या वरिष्ठांनी ठरवली आहे. www.konkantoday.com