राज्यातील 48 जागांवर महाविकास आघाडीचाच विजय होणार-उद्धव ठाकरे.
मुंबईमध्ये इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 48 जागांवर महाविकास आघाडीचाच विजय होणार असल्याचा दावा केला. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणूकीमध्ये इंडिया आघाडीचा विजय झाल्यास पंतप्रधान कोण याबाबत देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडी निवडणूक जिंकली तर इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदासाठी चेहरा कोण असा सवाल विचारण्यात आला. त्याचबरोबर आपण देखील यासाठी उत्सुक आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आमची इंडिया आघाडी देशाची लोकशाही आणि स्वातंत्र वाचवण्यासाठी बनवलेली आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे आमच्या इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे आहेत. आम्ही वर्षाला एक पंतप्रधान करु शकतो असं पंतप्रधान मोदी म्हणतात. म्हणजेच त्यांना त्यांचा पराभव मान्य असून त्यांना माहिती आहे त्याचं सरकार आता येत नाही,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा कोण हा प्रश्नच नाहीये. प्रश्न आहे तो भाजपकडे आहे. कारण भाजपकडे एकच चेहरा आहे. आणि तोही चेहरा आता चालत नाहीये. भाजप काहीही म्हणू दे. भाजप आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रम्हदेव नाहीत. पंतप्रधान पदाबाबत आमच्या बैठकीमध्ये ठरलेले आहे. एकच प्रोडक्ट किती वेळी लॉंन्च करणार असा प्रश्न भाजपपुढे निर्माण झालेला आहे. प्रत्येकवेळी निवडणूक आल्यानंतर हे बोहल्यावर चढतात. आता त्यांचा चेहरा चालत नाही आणि मोदी लाट कुठे नाही. पण भाजपला निवडणूक जवळ आल्यामुळे पंतप्रधान पदाचा चेहरा बदलता येत नाहीये हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.www.konkantoday.com