
रत्नागिरीत ६० लाखांच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरुणाचे अपहरण करणार्या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
६० लाखांच्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरुणाचे अपहरण करणार्या इम्रान रौफ बागवान (वय ३०, रा.निपाणी) व त्याचा मित्र अनिल अशा दोघांविरोधात शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.दि. १३ मे रोजी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील हॉटेल सावंत पॅलेस समोर हि घटना घडली.जहिर शौकत बागवान (वय ३० सध्या रा. पिंपळेश्वर चौक, ता.जि.सातारा) यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार दि. १३ मे रोजी रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास जहिर व त्यांच्या मित्र आतिक शेख हे दोघे आपल्या ताब्यातील कारमधून रेल्वे स्थानकाकडे जात होते. यावेळी हॉटेल सावंत पॅलेस समोर इम्रान रौफ बागवान याने आपली गाडी थांबविली. त्यानंतर इम्रान व त्याचा मित्र अनिल यांनी आपल्याला त्याच्या गाडीत भरले. त्यानंतर निपाणी येथे आपल्याला बेदम मारहाण केली व आपल्याला कोंडून ठेवण्यात आले होते. आपण घाबरलो असल्याने तात्काळ पोलीस स्थानकात तक्रार दिली नाही. जहिर बागवान यांनी शुक्रवारी रात्री शहर पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हे.कॉ.विलास जाधव करत आहेत.www.konkantoday.com