मुंबईत लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे घटना सुरूच

आईसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाचा ठाकूर्ली-डोंबिवली दरम्यान खांबाची धडक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर पाच दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.शुक्रवारी त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली.भिवंडीत राहणारा सुनील चव्हाण हा तरुण १३ मे रोजी आईसबोत मुंबईतील नातेवाईकांकडे जात होता. कल्याणमधून दुपारी १. ३० वाजताची लोकल त्यांनी पकडली. सुनील दरवाज्याजवळ थांबला होता.डोंबिवली- ठाकूर्ली दरम्यान खांबाची धडक बसल्याने तो ट्रेनमधून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पाच दिवस त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.डोंबिवली- ठाकूर्ली दरम्यान खांबाची धडक बसल्याने तो ट्रेनमधून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पाच दिवस त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दुसऱ्या घटनेत उल्हासनगर येथे राहणाऱ्या पद्मनन्ना पिरांन्ना पुजारी (वय 55) यांचा ट्रेनमधून मृत्यू झाला. पद्मन्ना पुजारी हे मुंबईत कामाला होते. दररोज उल्हासनगरमधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या पद्मन्ना शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोकलमधून प्रवास करत होते.लोकलने कल्याण स्टेशन सोडल्यानंतर संध्याकाळी 7.45 दरम्यान उल्हासनगरमध्ये उतरण्यासाठी ते लोकलच्या दरवाजात थांबलेले. मात्र त्यावेळी मागून आलेल्या रेट्यामुळे त्यांचा तोल गेल्याने विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर दरम्यान ते लोकलमधून खाली पडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पद्मन्ना यांना रेल्वे पोलिसांनी तातडीने उपचारासाठी उल्हासनगरमधील सेन्ट्रल रुग्णालयात दाखल केलं. यानंतर त्यांच्या मुलाने त्याना चांगले उपचार मिळावेत म्हणून खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला मात्र रुग्णालयात पोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.www konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button