दी यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग येथे परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा
रत्नागिरी : येथील दी यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंग येथे परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त, माजी आमदार बाळासाहेब माने उपस्थित होते.२० व्या शतकात जागतिक युद्धाच्या कालावधीत सैनिकांची सेवाशुश्रुषा करून त्यांना बरं करणाऱ्या परिचारीका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त परिचारिका दिन साजरा केला जातो. दी यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमध्ये स्थापनेपासून हा दिन विविध उपक्रमांना साजरा होतो. या वेळी कॉलेजच्या रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, प्रभारी प्राचार्य चेतन अंबुपे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींनी विविध गीतांवर नृत्य सादर केली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.www.konkantoday.com