
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार -मुक्ता दाभोळकर
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष स्व. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी असणार्या आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली, याबद्दल आपण समाधानी आहोत. मात्र या प्रकरणातून जे सुटले आहेत, त्या मास्टरमाईंड विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.चिपळूण पोलीस स्थानकात जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनानुसार अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या मुक्ता दाभोळकर व विनोद वायंगणकर यांचा जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा व सामाजिक बहिष्काराविरोधी कायद्याविषयी बुधवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.www.konkantoday.com