
जगबुडी पुलावर भरधाव वेगातील कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जगबुडी नदीच्या कठड्यावर आदळून चालक थेट ६० फूट खोल नदीपात्रात कोसळून अपघात
मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी पुलावर भरधाव वेगातील कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जगबुडी नदीच्या कठड्यावर आदळून चालक थेट ६० फूट खोल नदीपात्रात कोसळून अपघात झाला. मुंबई गोवा महामार्गावरून जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने जगबुडी नदी पुलावरील कठड्यावर जावून आदळला. या अपघातानंतर भरधाव वेगातील कंटेनर जगबुडी नदीवरील दोन्ही पुलांच्या कठड्यामध्ये असणार्या जागेत अडकल्याने नदीपात्रात कोसळण्यापासून बचावला. मात्र या अपघातात कंटेनर ट्रकचालक थेट ६० फूट खाली जगबुडी नदीपात्रात कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस, महामार्ग पोलिस विभाग कशेडीचे समेल सुर्वे हे आपल्या सहकार्यांसह व मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, खेड रेस्कु टीमचे बुरहान टाके, सामाजिक कार्यकर्ते शैलेश चव्हाण, रुपेश पवार, रवी पवार, स्वप्नील पाटणे, नाना पवार, संतोष नलावडे, विनय तोडणकर यांच्यासह भरणे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भरणे येथील तरुणांनी जगबुडी नदीपात्रात उतरून खाली कोसळलेल्या चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल येथे दाखल केले.www.konkantoday.com